Site icon Ajinkya Innovations

Child labour act कलम १६ : गुन्ह्यासंबंधीची कार्यपद्धती :

बाल कामगार अधिनियम १९८६
कलम १६ :
गुन्ह्यासंबंधीची कार्यपद्धती :
१) या अधिनियमाखाली कोणत्याही व्यक्तीस, पोलीस अधिकाऱ्यास किंवा निरीक्षकास, सक्षम अधिकारिता असणाऱ्या कोणत्याही न्यायालयात अपराध घडल्याची फिर्याद दाखल करता येईल.
२) बालकाच्या वयासंबंधी विहित वैद्यकीय प्राधिकरणाने दिलेले प्रत्येक प्रमाणपत्र हे या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, ते ज्याच्या संबंधीचे असेल त्या बालकाच्या वयाबाबतचा निर्णायक पुरावा असेल.
३) महानगर दंडाधिकारी किंवा प्रथमवर्ग दंडाधिकारी यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जांचे कोणतेही न्यायालय या अधिनियमाखालील कोणत्याही गुन्ह्यांची संपरीक्षा करणार नाही.

Exit mobile version