Site icon Ajinkya Innovations

Bsa कलम ९ : एरव्ही संबद्ध नसलेली तथ्ये केवा संबद्ध होतात:

भारतीय पुरावा अधिनियम २०२३
कलम ९ :
एरव्ही संबद्ध नसलेली तथ्ये केवा संबद्ध होतात:
एरव्ही संबद्ध नसलेली तथ्ये –
१) जर ती कोणत्याही वादतथ्याशी किंवा संबद्ध तथ्याशी विसंगत असतील तर;
२) जर निव्वळ तीच किंवा अन्य तथ्यांच्या संबंधात ती विचारात घेतल्यास कोणत्याही वादतथ्याचे किंवा संबद्ध तथ्याचे अस्तित्व किंवा नास्तित्व अत्यांत संभाव्या किंवा असंभाव्या ठरत असेल तर, संबद्ध असतात.
उदाहरणे :
(a) क) (ऐ) ने विवक्षित दिवशी चैन्नईला गुन्हा केला किंवा काय हा प्रश्न आहे. त्या दिवशी (ऐ) लद्दाखमध्ये होता हे तथ्य संबद्ध आहे. गुन्हा जेव्हा घडला त्या वेळेच्या आसपास तो घडल्याच्या स्थळापासून (ऐ) दूर अंतरावर होता या तथ्यामुळे, त्याने गुन्हा केला असावा ही गोष्ट अशक्य जरी नाही तरी अगदी असंभाव्य होऊ शकत असल्यामुळे ते तथ्य संबद्ध आहे.
(b) ख) (ऐ) ने गुन्हा केला आहे किंवा काय हा प्रश्न आहे. गुन्हा (ऐ) ने किंवा (बी) ने किंवा (सी) ने किंवा (डी) ने केला असला पाहिजे अशी परिस्थिती आहे. गुन्हा अन्य कोणीही करु शकला नसता व तो (बी) ने, (सी) ने किंवा (डी) नेही केला नव्हता हे दर्शवणारे प्रत्येक तथ्य संबद्ध आहे.

Exit mobile version