भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ९६ :
संदिग्ध दस्तऐवज स्पष्ट करणारा किंवा त्यात सुधारणा करणारा पुरावा वगळणे:
जेव्हा दस्तऐवजात केलेली शब्दयोजना सकृतदर्शनी संदिग्ध असेल किंवा त्यामध्ये काही उणिवा असतील तेव्हा, जी तथ्ये तिचा अर्थ दाखवू शकतील किंवा त्या उणिवा भरून काढू शकतील त्यांचा पुरावा देता येणार नाही.
उदाहरण :
(a) क) (ऐ) हा (बी) ला १००००० रुपयाला किंवा १५०००० रुपयाला घोडा विकण्याचा लेखी करार करतो. यांपैकी कोणती किंमत द्यावयाची होती त्याचा पुरावा देता येणार नाही.
(b) ख) विलेखात कोऱ्या जागा आहेत. त्या कशा प्रकारे भरण्याचे अभिप्रते होते ते दाखवू शकणाऱ्या तथ्यांचा पुरावा देता येत नाही.
