Site icon Ajinkya Innovations

Bsa कलम ४८ : विशिष्ट प्रकरणांमध्ये पूर्व चारित्र्याचा पुरावा किंवा पूर्वीचा लैंगिक अनुभव संबद्ध नसणे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ४८ :
विशिष्ट प्रकरणांमध्ये पूर्व चारित्र्याचा पुरावा किंवा पूर्वीचा लैंगिक अनुभव संबद्ध नसणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ याचे कलम ६४, कलम ६५, कलम ६६, कलम ६७, कलम ६८, कलम ६९, कलम ७०, कलम ७१, कलम ७४, कलम ७५, कलम ७६, कलम ७७ किंवा कलम ७८ या कलमांखालील अपराधांसाठीच्या खटल्यात किंवा जेथे संमतीचा प्रश्न हा वादप्रश्न असेल अशा असा कोणताही प्रयत्न केल्यासंबंधीच्या खटल्यात, पीडित व्यक्तीच्या चारित्र्यसंबंधीचा पुरावा किंवा अशा व्यक्तीने अन्य कोणत्याही व्यक्तीबरोबर पूर्वी लैंगिक अनुभव घेतल्याचा पुरावा हा, अशा संमतीच्या प्रश्नावर किंवा संमतीच्या गुणवत्तेच्या प्रश्नावर संबद्ध (सुसंगत) बाब असणार नाही.

Exit mobile version