Site icon Ajinkya Innovations

Bsa कलम ४२ : हक्काच्या अगर सर्वसाधारण रूढीच्या अस्तित्वासंबंधीची मते केव्हा संबद्ध :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ४२ :
हक्काच्या अगर सर्वसाधारण रूढीच्या अस्तित्वासंबंधीची मते केव्हा संबद्ध :
कोणत्याही सर्वसाधारण रूढीच्या किंवा हक्काच्या अस्तित्वाबाबत जेव्हा न्यायालयाला मत बनवावयाचे असेल तेव्हा, अशी रूढी किंवा असा हक्क अस्तित्वात असल्यास त्यांचे अस्तित्व ज्यांना ज्ञात असण्याचा संभव असेल त्या व्यक्तींची अशा रूढीच्या किंवा हक्काच्या अस्तित्वाबाबतची मते संबद्ध असतात.
स्पष्टीकरण :
सर्वसाधारण रूढी किंवा हक्क या शब्दप्रयोगात, ज्या वर्गातील व्यक्तींची संख्या लक्षणीय असेल अशा कोणत्याही व्यक्तिवर्गात प्रचलित असलेल्या रूढींचा किंवा हक्कांचा समावेश आहे.
उदाहरण :
विशिष्ट विहिरीचे पाणी वापरण्याचा विशिष्ट गावाच्या गावकऱ्यांचा हक्क हा या कलमाच्या अर्थानुसार सर्वसाधारण हक्क आहे.

Exit mobile version