भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
भाग ४ :
पुरावा हजर करणे व पुराव्याचा परिणाम :
प्रकरण ७ :
शाबितीची जबाबदारी विषयी :
कलम १०४ :
शाबितीची जबाबदारी :
जो कोणी स्वत: प्रपादन केलेल्या तथ्यांच्या अस्तित्वावर अवलबून असलेल्या कोणत्याही वैध हक्काबाबत किंवा दायित्वाबाबात न्यायनिर्णय देण्यास कोणत्याही न्यायालयाला आवाहन करील, त्याने ती तथ्ये अस्तित्वात असल्याचे शाबती केले पाहिजे आणि जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही तथ्यांचे अस्तित्व शाबीत करण्यास बांधलेली असते तेव्हा, शाबितीची जबाबदारी त्या व्यक्तीवर आहे असे म्हटले जाते.
उदाहरणे :
(a) क) (बी) ने जो गुन्हा केलेला आहे असे (ऐ) म्हणतो त्याबद्दल (बी) ला शिक्षा करण्यात येत आहे असा न्यायनिर्णय दिला जावा असे (ऐ) न्यायालयाला आवाहन करतो. (बी) ने गुन्हा केलेला आहे असे (ऐ) ने शाबीत केले पाहिजे.
(b) ख) जी तथ्ये खरी असल्याचे (ऐ) प्रपादन करतो व (बी) नाकबूल करतो त्यामुळे (ऐ) हा न्यायालयाला, तो (बी) च्या कब्जातील विवक्षित जमिनीला हक्कदार आहे असा न्यायनिर्णय देण्यास सांगतो. (ऐ) ने त्या तथ्यांचे अस्तित्व शाबीत केले पाहिजे.
