Bsa कलम ९८ : विद्यामान तथ्याचां अर्थ लागत नसलेल्या दस्तऐवजासंबंधी पुरावा:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ९८ :
विद्यामान तथ्याचां अर्थ लागत नसलेल्या दस्तऐवजासंबंधी पुरावा:
जेव्हा दस्तऐवजात वापरलेली भाषा स्वयंसपष्ट असेल, पण विद्यामान तथ्यांच्या संदर्भात तिचा अर्थ लागत नसेल तेव्हा, ती विशिष्ट अर्थाने वापरली होती हे दाखवून देणारा पुरावा देता येईल.
उदाहरण :
एका विलेखान्वये (ऐ) आपले कलकत्यातील घर (बी) ला विकतो. (ऐ) चे कलकत्यात एकही घर नव्हते. पण असे दिसते की, हावड्याला त्याचे एक घर होते व विलेखाचे निष्पादन झाल्यापासून (बी) कडे त्याचा कब्जा होता. तो विलेख हावडा येथील घराशी संबंधित होता हे दाखवून देण्यासाठी ही तथ्ये शाबीत करता येतील.

Leave a Reply