भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ९७ :
दस्तऐवज सुस्पष्ट असेल तर दुसरा पुरावा देता येत नाही:
जेव्हा दस्तऐवजात वापरलेली भाषा स्वयंस्पष्ट असेल व ती विद्यामान तथ्यांना नेमकी लागू होत असेल तेव्हा, ती अशा तथ्यांना लागू करणे अभिप्रेत नव्हते हे दाखवून देऱ्यासाठी पुरावा देता येणार नाही.
उदाहरण :
(ऐ) एका विलेखान्वये (बी) ला आपली रामपूर येथील १०० बिघ्यांची मिळकत विकतो. रामपूर येथे (ऐ) ची १०० बिघ्यांची मिळकत आहे. विकण्याचे अभिप्रेत असलेली संपदा निराळ्या जागी होती व निराळ्या आकारमानाची होती या तथ्याचा पुरावा देता येणार नाही.