Bsa कलम ८१ : इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल नमुन्यामधील राजपत्रांचे संदर्भात अनुमान :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ८१ :
इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल नमुन्यामधील राजपत्रांचे संदर्भात अनुमान :
न्यायालय असे गृहीत धरील की, जो इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल अभिलेख मान्यताप्राप्त राजपत्रात आहे अगर कायद्याप्रमाणे असे इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल अभिलेख ठेवण्याचा आदेश आहे अशा प्रकारचा असेल आणि जर असा इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल अभिलेख कायद्याने मंजूर केलेल्या नमुन्यात असेल आणि तो जर योग्य ताबा असलेल्या व्यक्तिने हजर केले असेल तर तो अभिलेख अस्सल आहे.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या आणि कलम ९३ च्या प्रयोजनांसाठी, इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज ज्या ठिकाणी व ज्या व्यक्तिजवळ असणे स्वाभाविक आहे त्या ठिकाणी व त्या व्यक्तिच्या ताब्यात असतील तर ते योग्य ताब्यात असेल असे म्हटले जाते , मात्र ज्या ताब्याचा उगम वैध असल्याचे शाबीत झाले असेल किंवा त्या विशिष्ट प्रकरणातील परिस्थितीमुळे तसा उगम संभाव्य ठरत असेल तर, असा कोणताही ताबा अयोग्य नसतो.

Leave a Reply