भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ६९ :
साक्षांकित दस्तऐवजातील पक्षाकडून निष्पादनाची कबुली:
एखादा साक्षांकित दस्तऐवज साक्षांकित करणे कायद्याने आवश्यक केले असले तरी, त्यातील पक्षाने स्वत: तो निष्पादित केल्याची कबुली ही त्याच्या निष्पादनाची त्या पक्षापुरती पुरेशी शाबीती असेल.