Bsa कलम ३ : वादतथ्यांचा व संबद्ध तथ्यांचा पुरावा देता येईल :

भारतीय पुरावा अधिनियम २०२३
भाग २ :
प्रकरण २ :
तथ्यांच्या संबंद्धते (सुसंगतते) विषयी :
कलम ३ :
वादतथ्यांचा व संबद्ध तथ्यांचा पुरावा देता येईल :
कोणत्याही दाव्यात किंवा कार्यवाहीत प्रत्येक वादतथ्याच्या आणि जी तथ्ये संबद्ध असल्याचे यात यापुढे घोषित केलेले असेल अशा अन्य तथ्यांच्या अस्तित्वाबद्दल किंवा नास्तित्वामद्दल पुरावा देता येईल, इतरांच्याबद्दल नाही.
स्पष्टीकरण :
दिवाणी प्रक्रियेसंबंधी त्या त्या काळी अमलात असलेल्या कायद्याच्या कोणत्याही उपबंधामुळे जे तथ्य शाबीत करण्याचा एखाद्या व्यक्तीचा हक्क काढून घेतला गेला असेल त्याबद्दल पुरावा देणे या कलमाच्या आधारे तिला शक्य होणार नाही.
उदाहरणे :
(a)क) (बी) चा मृत्यु घडवून आणण्याच्या उद्देशाने त्याला दंडुक्याने मारहाण करुन त्याचा खून केल्याबद्दल (ऐ) ची संपरिक्षा करण्यात आली आहे.
(ऐ) च्या संपरीक्षेत पुढील वादतथ्ये आहेत :
(ऐ) ने (बी) ला दंडुक्याने मारहाण करणे;
अशी मारहान करुन (ऐ) ने (बी) चा मृत्यु घडवून आणणे;
(बी) चा मृत्यू घडवून आणण्याचा (ऐ) चा उद्देश.
(b)ख) वादपक्षकार ज्या बंधपत्रावर विसंबून आहे ते त्याने त्या खटल्याच्या पहिल्या सुनावणीच्या वेळी आपल्याबरोबर आणलेले नाही व हजर करण्यासाठी तयार ठेवलेले नाही. कार्यवाही नंतरच्या टप्प्यात असताना, दिवाणी प्रक्रिया संहितेने उपबंधित केलेल्या शर्तीचे अनुसरण केल्याशिवाय अन्यथा बंधपत्र हजर करणे किंवा त्यातील मजकूर शाबीत करणे या कलमाच्या आधारे त्याला शक्य होणार नाही.

Leave a Reply