Bsa कलम ३४ : आधीचे न्यायनिर्णय दुसऱ्या कार्यवाहीत सरोध करण्याचे दृष्टीने संबद्ध:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
न्यायालयांचे न्यायनिर्णय केव्हा संबद्ध :
कलम ३४ :
आधीचे न्यायनिर्णय दुसऱ्या कार्यवाहीत सरोध करण्याचे दृष्टीने संबद्ध:
कोणत्याही न्यायालयाने एखाद्या दाव्याची दखल घ्यावयास हवी किंवा काय अथवा एखादी संपरीक्षा करावयास हवी किंवा काय हा प्रश्न असेल तेव्हा, ज्या कोणत्याही न्यायनिर्णयामुळे, आदेशामुळे किंवा हुकूमनाम्यामुळे अशा न्यायालयाला अशा दाव्याची दखल घेण्यास किंवा अशी संपरीक्षा करण्यास कायद्याने प्रतिबंध होतो त्याचे अस्तित्व हे संबद्ध तथ्य असते.

Leave a Reply