Bsa कलम १७० : निरसन आणि व्यावृत्ति :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १७० :
निरसन आणि व्यावृत्ति :
१) भारतीय पुरावा अधिनियम १८७२ (१८७२ चा १) याद्वारे निरसित करण्यात येत आहे.
२) असे निरसन झाले असले तरीही, हा अधिनियम ज्या तारखेपासून अमलात येईल त्या तारखेपूर्वी, जर कोणतेही अपील, अर्ज, संपरीक्षा, चौकशी, अन्वेषण किंवा कार्यवाही प्रलंबित असेल तर कोणताही अपील, अर्ज, संपरीक्षा, चौकशी, अन्वेषण किंवा कार्यवाही जणू काही हा अधिनियम अंमलात आलेला नसावा त्याप्रमाणे अशा प्रारंभाच्या निकटपूर्वी भारतीय पुरावा अधिनियम १९७२ जसा अमलात होता त्याच्या उपबंधांनुसार निकालात काढले जाईल, चालू ठेवण्यात येईल किंवा करण्यात येईल.

Leave a Reply