भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १६६ :
मागवण्यात आलेला आणि नोटिशीवरून हजर करण्यात आलेला दस्तऐवज पुरावा म्हणून देणे :
जो दस्तऐवज हजर करण्यासाठी एखाद्या पक्षकाराने दुसऱ्या पक्षकाराला नोटीस दिलेली असेल तो दस्तऐवज जेव्हा तो मागवतो आणि असा दस्तऐवज हजर करण्यात येऊन तो हजर करण्याची मागणी करणारा पक्षकार त्याचे निरीक्षण करतो तेव्हा, तो हजर करणाऱ्या पक्षकाराने त्याच्याकडे तशी मागणी केल्यास तो दस्तऐवज पुरावा म्हणून देण्यास दुसरा पक्षकार बांधलेला असतो.