Bsa कलम १५९ : संबद्ध तथ्याला पुष्टी मिळण्याकडे रोख असलेले प्रश्न स्वीकार्य असतात :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १५९ :
संबद्ध तथ्याला पुष्टी मिळण्याकडे रोख असलेले प्रश्न स्वीकार्य असतात :
एखाद्या साक्षीदाराने कोणत्याही तथ्याविषयी दिलेल्या साक्षीला परिपुष्टी मिळावी असा इरादा असेल तर, असे संबद्ध तथ्य घडले त्या वेळी किंवा त्या वेळेच्या आसपास अथवा त्या ठिकाणी किंवा त्याच्या आसपास जी अन्य कोणतीही परिस्थिती त्याला आढळली असेल ती शाबीत झाल्यास साक्षीदार ज्या संबद्ध तथ्याविषयी साक्ष देत आहे त्याबाबत साक्षीदाराने दिलेल्या साक्षीला ती परिपोषक होईल असे न्यायालयाचे मत असेल तर, साक्षीदाराला अशा परिस्थितीबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतील.
उदाहरण :
(ऐ) हा सहअपरादी ज्या जबरी चोरीत त्याने भाग घेतला तिचा वृत्तांत देतो. ज्या ठिकाणी ती घडली तेथे व तेथून तो जाण्याच्या मार्गावर असताना जबरी चोरीशी संबंध नसलेल्या ज्या विविध घटना घडल्या त्यांचे तो वर्णन करतो. नुसत्या जबरी चोरीविषयीच्या त्याच्या साक्षीला परिपुष्टी देण्यासाठी त्या तथ्यांचा स्वतंत्र पुरावा देता येईल.

Leave a Reply