Bsa कलम १४३ : साक्ष तपासणीचा क्रम आणि फेरतपासणीचा रोख :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १४३ :
साक्ष तपासणीचा क्रम आणि फेरतपासणीचा रोख :
१) साक्षीदाराची प्रथम सरतपासणी होईल, नंतर (विरूद्ध पक्षकाराची तशी इच्छा असेल तर) उलटतपासणी होईल, नंतर (त्याला बोलावणाऱ्या पक्षकाराची तशी इच्छा असेल तर) फफेरतपासणी होईल.
२) साक्षतपासणी व उलटतपासणी संबद्ध तथ्यांशी संबंधित असल्या पाहिजेत, पण उलटतपासणी ही साक्षीदाराने आपल्या सरतपासणीत ज्या तंथ्यांबद्दल साक्ष दिली त्यांच्यापुरती मर्यादित असली पाहिजे असे नाही.
३) उलटतपासणीत निर्दिष्ट केलेल्या बाबींचे स्पष्टीकरण करून घेण्याच्या दिशेने फेरतपासणीचा रोख असावा लागेल; व जर न्यायालयाच्या परवानगीने फेरतपासणीत नवीन बाब प्रस्तुत केली गेली तर विरूद्ध पक्षकाराला त्या बाबींवर आणखी उलटतपासणी करता येईल.

Leave a Reply