भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १३३ :
स्वेच्छापूर्वक पुरावा दिल्याने अप्रकटनाचा हक्क वर्जिला असे होत नाही :
जर दाव्यातील कोणत्याही पक्षकाराने त्यात स्वत: होऊन किंवा अन्यथा पुरावा दिला तर, त्यामुळे कलम १३२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे अशा गोष्टी प्रकट करण्याला त्याने संमती दिली असल्याचे मानले जाणार नाही, व जर दाव्यातील किंवा कार्यवाहीतल पक्षकाराने अशा कोणत्याही वकिलाला साक्षीदार म्हणून बोलावले तर, प्रश्न विचारण्यात आल्याशिवाय अशा वकिलाला ज्या बाबी प्रकट करण्याची मोकळीक असणार नाही त्याबाबत त्या पक्षकाराने असे प्रश्न विचारले तरच त्या याप्रमाणे प्रकट केल्या जाण्यास त्याने संमती दिली असल्याचे मानले जाईल.