Bsa कलम १०९ : माहीत असलेले तथ्य शाबीत करण्याची जबाबदारी :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १०९ :
माहीत असलेले तथ्य शाबीत करण्याची जबाबदारी :
जेव्हा कोणतेही तथ्य विशेषकरून एखाद्या व्यक्तीच्या माहितीच्या कक्षेत असते तेव्हा, ते तथ्य शाबीत करण्याची जबाबदारी तिच्यावर असते.
उदाहरणे :
(a) क) कृतीचे स्वरुप व परिस्थिती यांवरुन सूचित होणाऱ्या उद्देशाहून अन्य एखाद्या उद्देशाने जेव्हा एखाद्या व्यक्तीने ती कृती केली असेल तेव्हा, तो उद्देश शाबीत करण्याची जबाबदारी तिच्यावर असते.
(b) ख) (ऐ) वर विनातिकीट रेल्वेप्रवास केल्याचा दोषारोप आहे. त्याच्याकडे तिकीट होते हे शाबीत करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे.

Leave a Reply