Site icon Ajinkya Innovations

Bp act कलम ९३ : दावा न सांगितलेली गुराढोरांची विक्री :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ९३ :
दावा न सांगितलेली गुराढोरांची विक्री :
१) एखाद्या जनावरास कोंडवाड्यात घातल्यानंतर दहा दिवसांच्या आत, त्या जनावराचा मालक म्हणून कोणत्याही व्यक्तीने कलम ९४ अन्वये आकारण्यात आलेली कोणतीही कोंडवाड्याबद्दलची फी व खर्च दिला नाही तर, असे जनावर ताबडतोब लिलावाने विकण्यात येईल आणि विक्रीपासून झालेल्या उत्पन्नातून उपरिनिर्दिष्ट फी व खर्च वजा करण्यात आल्यावर शिल्लक राहिलेली रक्कम, जी कोणतीही व्यक्ती, विक्रीनंतर पंधरा दिवसांच्या आत या संबंधात आयुक्त प्राधिकृत करील अशा अधिकाऱ्याची १.(***) खात्री होईल अशा रीतीने आपण त्या जनावराचा मालक होतो, असे सिद्ध करील, तीस देण्यात येईल आणि इतर कोणत्याही बाबतीत ती राज्याच्या संचित निधीचा भाग म्हणून समजण्यात येईल.
२) कोणताही पोलीस अधिकारी किंवा कोंडवाड्याचा रक्षक पोट-कलम (१) अन्वयेच्या विक्रीच्या वेळी कोणतीही गुरे प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष रीतीने विकत घेणार नाही.
——–
१. सन १९५३ चा मुंबई अधिनियम क्रमांक २० याच्या कलम १२ अन्वये अथवा कलम ९० अन्वये नेमलेल्या इतर कोणत्याही अधिकाऱ्याची हा मजकूर वगळण्यात आला.

Exit mobile version