Site icon Ajinkya Innovations

Bp act कलम २२ह : परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची कार्ये :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२ह :
परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची कार्ये :
परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ पुढील कार्ये पार पाडील :-
अ) हे मंडळ, त्या परिक्षेत्रांतर्गत पोलीस उप-निरीक्षक ते पोलीस निरीक्षक या दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्व बदल्या, पदस्थापना व सेवाविषयक इतर बाबी निर्णीत करील.
ब) मंडळास, पोलीस उप-निरीक्षक ते पोलीस निरीक्षक या दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांची पदस्थापना व बदल्या परिक्षेत्राबाहेर करण्यासंबंधात पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ याला उचित शिफारशी करण्यासाठी प्राधिकृत केलेले असेल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ, पोलीस अधिकारी या शब्दप्रयोगाचा अर्थ, पोलीस उप-निरीक्षक ते पोलीस निरीक्षक या दर्जाचा पोलीस अधिकारी असा आहे.

Exit mobile version