Site icon Ajinkya Innovations

Bp act कलम १५६ : कार्यपद्धतीमध्ये दोष म्हणून नियम – आदेश अवैध न ठरणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १५६ :
कार्यपद्धतीमध्ये दोष म्हणून नियम – आदेश अवैध न ठरणे :
या अधिनियमाच्या कोणत्याही उपबंधान्वये किंवा या अधिनियमाअन्वये केलेल्या कोणत्याही नियमाच्या कोणत्याही उपबंधान्वये किंवा बहुतांशी त्यास अनुसरुन केलेला किंवा प्रसिद्ध केलेला कोणताही नियम, आदेश, निदेश, अभिनिर्णय, चौकशी किंवा अधिसूचना आणि त्यानुसार केलेले कोणतेही कृत्य, त्या कार्यपद्धतीत कोणताही दोष असल्याच्या किंवा कोणतीही नियमबाह्यता झाल्याच्या कारणावरुन बेकायदेशीर, रद्द, अवैध किंवा अपुरी आहेत असे समजण्यात येणार नाही.

Exit mobile version