Site icon Ajinkya Innovations

Bp act कलम १५२ : अपराधांबद्दल इतर कायद्यांप्रमाणे खटला भरण्यास बाधा न येणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १५२ :
अपराधांबद्दल इतर कायद्यांप्रमाणे खटला भरण्यास बाधा न येणे :
या अधिनियमान्वये शिक्षेस पात्र असेल अशा कोणत्याही अपराधाबद्दल, इतर कोणत्याही अधिनियमान्वये कोणत्याही व्यक्तीवर खटला भरुन तीस शिक्षा देण्यास किंवा इतर कोणत्याही अधिनियमान्वये शिक्षेस पात्र असणाऱ्या एखाद्या अपाराधाबद्दल तिच्यावर या अधिनियमान्वये खटला भरुन तीस शिक्षा देण्यास प्रतिबंध होतो असा या अधिनियमातील कोणत्याही मजकुराचा अर्थ लावण्यात येणार नाही.
परंतु असे की, असे सर्व खटले १.( फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८ ) च्या कलम १०३ च्या उपबंधाच्या अधीन असतील.
———
१.(आता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) पहा.

Exit mobile version