Site icon Ajinkya Innovations

Bp act कलम १४९ : कलम ७० मधील आदेशास विरोध करणे अगर अनुपालन न करणे शिक्षा :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १४९ :
कलम ७० मधील आदेशास विरोध करणे अगर अनुपालन न करणे शिक्षा :
जी कोणतीही व्यक्ती, कलम ७० अन्वये दंडाधिकाऱ्याने किंवा पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या कोणत्याही वाजवी निदेशास विरोध करील किंवा त्याचे अनुपालन ताबडतोब करणार नाही किंवा अशा निदेशास विरोध करण्यात किंवा त्याचे अनुपालन न करण्यात मदत करील तीस अपराधसिद्धीनंतर, एक वर्षांपर्यंत असू शकेल अशी कैदेची शिक्षा होईल, परंतु ती लेखी नमूद करावयाच्या कारणाखेरीज, चार महिने मुदतीपेक्षा कमी असणार नाही आणि तिला दंडाचीही शिक्षा होईल.

Exit mobile version