Site icon Ajinkya Innovations

Bp act कलम १३१-अ : १.(२.(सार्वजनिक करमणुकीच्या ३.(किंवा नृत्यशाळेच्या) जागेचे मुदतीत लायसेन्स न घेणे खाद्यगृहाचे नोंदणीपत्र न घेणे, नूतनीकरण वगैरेंबद्दल शिक्षा :)

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १३१-अ :
१.(२.(सार्वजनिक करमणुकीच्या ३.(किंवा नृत्यशाळेच्या) जागेचे मुदतीत लायसेन्स न घेणे खाद्यगृहाचे नोंदणीपत्र न घेणे, नूतनीकरण वगैरेंबद्दल शिक्षा 🙂
१) जो कोणी सार्वजनिक करमणुकीच्या जागेच्या बाबतीत ४.(किंवा जेथे नृत्यशाळा चालविण्यात येते त्या जागेच्या बाबतीत) या अधिनियमान्वये लायसेन्स घेण्यात कसूर करील ५.(किंवा कोणत्याही खाद्यगृहाच्या बाबतीत या अधिनियमान्वयेचे नोंदणीपत्र मिळवण्यास कसूर करील किंवा विहित केलेल्या मुदतीत अशा लायसेन्सचे किंवा यथास्थिती, प्रमाणपत्र नवीन करुन घेण्यात) कसूर करील, तर त्यास दोषसिद्धीनंतर ६.(दोन हजार रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतक्या दंडाची शिक्षा होईल.
२) तसेच कोणत्याही अशा अपराधाबद्दलची न्यायचौकशी करणाऱ्या कोणत्याही न्यायालयाने ज्या सार्वजनिक करमणुकीच्या जागेच्या किंवा खाद्यगृहाच्या किंवा नृत्यशाळेच्या बाबतीत अपराध करण्यात आला असेल अशी सार्वजनकि करमणुकीची जागा ७.(किंवा खाद्यगृह) ८.(किंवा नृत्यशाळा चालविणारी) व्यक्ती जोपर्यंत ती, त्या बाबतीत लायसेन्स घेणार नाही किंवा यथास्थिती , लायसेन्स नवीन करुन घेणार नाही ९.(किंवा नोंदणी प्रमाणपत्र किंवा नवीन प्रमाणपत्र करुन देणार नाही) तोपर्यंत १०.(यथास्थिति, अशी जागा, नृत्यशाळा किंवा ११.(खाद्यगृह) बंद ठेवावे, असा निदेश देईल आणि त्यानंतर अशा व्यक्तीने ताबडतोब अशा निदेशाचे पालन करील.
३) जर ती व्यक्ती अशा कोणत्याही निदेशाचे पालन करण्यात कसूर करील तर, तीस अपराधसिद्धीनंतर, एक महिना मुदतीपर्यंत असू शकेल अशी कैदेची शिक्षा किंवा १२.(पाच हजार रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा किंवा दोन्हीही शिक्षा होतील.
४) पोटकलम (३) अन्वये केलेल्या कोणत्याही कार्यवाहीस बाध न आणता, न्यायलयाच्या निदेशाचे पालन करण्यात, अशा व्यक्तीने कसूर केल्यास यथास्थिती, आयुक्ताने किंवा जिल्हा दंडधिकाऱ्याने मते न्यायालयाच्या निदेशाचे पालम होण्यासाठी वाजवीरीत्या आवश्यक असेल असे उपाय योजता येतील किंवा असे उपाय योजण्याची व्यवस्था करता येईल किंवा अशा बळाचा उपयोग करता येईल किंवा अशा बळाचा उपयोग करविता येईल.)
——–
१. सन १९५४ चा मुंबई अधिनियम क्रमांक २८ याच्या कलम ११ अन्वये कलम १३१ क समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९६९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ याच्या कलम ४ (क) अन्वये मूळ समासटीपेऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. सन १९७४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ६ (क) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आले.
४. सन १९७४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमाकं १ याच्या कलम ६ (अ) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आले.
५. सन १९६९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ याच्या कलम ४ (अ) अन्वये किंवा अशा जागेच्या बाबतीत या अधिनियमान्वये मंजूर करण्यात आलेले लायसन विहित केलेल्या मुदतीत नवीन करुन घेण्यात या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
६. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम २८ (अ) अन्वये पन्नास रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
७. सन १९६९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ याच्या कलम ४ (ब) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
८. सन १९७४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ६ (ब) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
९. सन १९६९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ याच्या कलम ४ (ब) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
१०. सन १९७४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ६ (ब) (दोन) अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
११. सन १९७४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ५ अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आले.
१२. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम २८ (ब) अन्वये दोनशे रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Exit mobile version