महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १११ :
रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीस अडथळा करणे:
कोणतीही व्यक्ती रस्त्यावरील किंवा सार्वजनिक जागेतील कोणत्याही व्यक्तीस जाणूनबुजून ढकलणार नाही, दाटी करणार नाही, धक्का देणार नाही किंवा अडथळा करणार नाही किंवा आडदांडपणाच्या हालचाली करुन, धमकावणीचे हावभाव करुन, विनाकारण कोणत्याही मनुष्यास त्रास देऊन, किंकाळ्या फोडून, ओरडून, घोड्यास किंवा गुरांस जाणूनबुजून भिववून किंवा इतर रीतीने सार्वजनिक शांततेचा किंवा सुव्यवस्थेचा भंग करणार नाही.
