Site icon Ajinkya Innovations

Bp act कलम १०७ : स्वतंत्रपणे राखून न ठेवलेल्या ठिकाणी स्नान करणे किंवा धुणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १०७ :
स्वतंत्रपणे राखून न ठेवलेल्या ठिकाणी स्नान करणे किंवा धुणे:
सक्षम प्राधिकाऱ्याने स्नानाकरिता किंवा धुण्याकरिता स्वतंत्रपणे राखून न ठेवलेल्या कोणत्याही सार्वजनिक विहिरीत, तलावात किंवा त्याच्याजवळ किंवा सक्षम प्राधिकाऱ्याच्या आदेशान्वये अशा स्नानास किंवा धुण्यास मनाई केली असेल अशा कोणत्याही तळ्यात, कुंडात, नहरात किंवा नदीच्या, ओढ्याच्या, नाल्याच्या किंवा पाणी पुरवठ्याच्या उगमाच्या किंवा साधनाच्या भागात किंवा त्याच्याजवळ कोणतीही व्यक्ती स्नान करणार नाही किंवा धुणार नाही.

Exit mobile version