Bp act कलम ७५ : ज्या व्यक्तीच्या ताब्यातून प्राणी घेण्यात आला त्या व्यक्तीस तो परत देण्याची दंडाधिकाऱ्याची शक्ती :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ७५ :
ज्या व्यक्तीच्या ताब्यातून प्राणी घेण्यात आला त्या व्यक्तीस तो परत देण्याची दंडाधिकाऱ्याची शक्ती :
जेव्हा कलम ७४ अन्वये एखादा प्राणी दंडाधिकाऱ्यापुढे आणण्यात आला असेल तेव्हा उक्त दंडाधिकाऱ्यास, ज्या व्यक्तीच्या ताब्यातून उक्त प्राणी घेण्यात आला असेल त्या व्यक्तीस, आवश्यक वाटेल तेव्हा उक्त प्राणी हजर करणे आपणास बंधनकारक असेल असे आणि दंडाधिकाऱ्याची खात्री होईल असे तारणपत्र उक्त व्यक्तीने दिल्यावर तो प्राणी तिला परत करण्याबद्दल निदेश देता येईल किंवा उक्त प्राणी औषधोपचारासाठी व सांभाळासाठी एखाद्या उपचारालयात पाठवण्यात येईल आणि उक्त अधिनियमाच्या १.(कलम ३५ मध्ये तरतूद केल्याप्रमाणे ता तेथे अटकावून ठेवण्याच येईल असा निदेश देता येईल किंवा उक्त प्राण्याची विल्हेवाट किंवा सांभाळ व तो हजर करणे या बाबतीत त्यास योग्य असा आदेश देता येईल.
———
१. सन १९६४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ याच्या कलम ५ अन्वये कलम ६ब ची पोट-कलमे (२) आणि (३) या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply