महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १६४ :
सक्षम प्राधिकाऱ्याची संमती वगैरे त्याच्या सहीच्या लेखी दस्तऐवजावरुन सिद्ध करणे :
कोणतेही कृत्य करणे किंवा करण्याचे वर्जिणे किंवा कोणत्याही गोष्टीची वैधता ही जेव्हा या अधिनियमान्वये सक्षम प्राधिकाऱ्याच्या संमतीवर, मान्यतेवर, घोषणेवर, अभिप्रायावर किंवा खात्रीवर अवलंबून असेल तेव्हा अशी मान्यता, घोषणा, अभिप्राय किंवा खात्री यांचा आशय असेल किंवा त्याबद्दल मजकूर असेल असा सक्षम प्राधिकाऱ्याने सही केलेला लेखी दस्तऐवज हा त्याबद्दलचा पुरेसा पुरावा असेल.