Bp act कलम १५८ : एखाद्या व्यक्तीला ज्या क्षेत्रातून निघून जाण्याचे निदेश देण्यात आले असतील त्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी किंवा परतण्यासाठी त्या व्यक्तीने केलेले बंधपत्र जप्त करणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १५८ :
एखाद्या व्यक्तीला ज्या क्षेत्रातून निघून जाण्याचे निदेश देण्यात आले असतील त्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी किंवा परतण्यासाठी त्या व्यक्तीने केलेले बंधपत्र जप्त करणे :
कलम ६३ च्या पोटकलम (१) अन्वये परवानगी देण्यात आलेली कोणतीही व्यक्ती जर उक्त पोटकलमान्वये लादलेल्या किंवा उक्त कलमाच्या पोटकलम (२) अन्वये तिने लिहून दिलेल्या बंधपत्रातील कोणत्याही शर्तींचे पालन करण्यात कसूर करील तर तिच्या बंधपत्राचे समपहरण करण्यात येईल आणि अशा बंधपत्रामुळे जी बांधली गेली असेल अशी कोणतीही व्यक्ती त्याबद्दल दंड भरील किंवा असा दंड का भरण्यात येऊ नये याबद्दल न्यायालयाचे समाधान होईल असे कारण दाखवील.

Leave a Reply