Bp act कलम १३१-अअ : १.(नोकरांनी केलेल्या कृत्याबद्दल लायसेन्सधारकांचे सार्वजनिक करमणुकीच्या जागेचे दायित्व :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १३१-अअ :
१.(नोकरांनी केलेल्या कृत्याबद्दल लायसेन्सधारकांचे सार्वजनिक करमणुकीच्या जागेचे दायित्व :
सार्वजनिक करमणुकीच्या जागेच्या बाबतीत २.(किंवा ज्या जागेत नृत्यशाळा चालविण्यात येते त्या जागेच्या बाबतीत) या अधिनियमान्वये नोंदणीचे प्रमाणपत्र मिळवण्यात किंवा या अधिनियमान्वये मंजूर करण्यात आलेले लायसेन्स धारण करणाऱ्या व्यक्तीस, तसेच प्रत्यक्ष अपराध करणाऱ्या व्यक्तीस असा अपराध घडू नये म्हणून तिने सर्व योग्य व वाजवी सावधगिरी घेतली होती असे तिने सिद्ध केल्याखेरीज तिच्या स्पष्ट किंवा गर्भित परवानगीने तिच्यावतीने कृत्य करणाऱ्या तिच्या नोकराने किंवा इतर अभिकत्र्याने कलम १३१ अन्वये केलेल्या कोणत्याही अपराधाबद्दल जणू ते अपराध तिने स्वत:च केल्याप्रमाणे, जबाबदार समजण्यात येईल.)
———-
१. सन १९५६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या कलम १४ अन्वये १३१ कक समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९७४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ५ अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.

Leave a Reply