महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १३० :
खेळांमध्ये फसविणे :
जो कोणी पत्त्यांचा, फाशांचा किंवा इतर खेळ खेळण्यास किंवा पण किंवा पैज लावणे किंवा खेळाच्या यशापयशावर किंवा त्यांनी केलेल्या हातावर पैजा मारण्यात किंवा कोणत्याही खेळाचा, सामन्याचा (स्पोर्ट), करमणुकीच्या खेळाचा किंवा कसरतीचा शेवट अमुक तऱ्हेने होईल अशाबद्दल पैज मारण्यात, कोणतेही कपट करुन किंवा अवैधरीत्या युक्तीने किंवा लबाडी करुन दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकरिता किंवा इतरांकरिता पैशाची कोणतीही रक्कम किंवा मौल्यवान वस्तू जिंकील, तो भारतीय दंड संहितेच्या कलम ४१५ च्या अर्थाप्रमाणे फसवणूक केल्याबद्दल दोषी आहे असे समजण्यात येईल आणि तो त्याप्रमाणे शिक्षेस पात्र होईल.