Bp act कलम १२६ : चोरीचा संशय असलेली मालमत्ता ताब्यात असल्याबद्दल अगर देऊ केल्याबद्दल तारण व्यवसायी वगैरेंनी पोलिसांना माहिती न देणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १२६ :
चोरीचा संशय असलेली मालमत्ता ताब्यात असल्याबद्दल अगर देऊ केल्याबद्दल तारण व्यवसायी वगैरेंनी पोलिसांना माहिती न देणे:
जो कोणी तारण व्यवसायी, जुन्या मालमत्तेचा विक्रेता किंवा धातूचे काम करणारा कामगार असेल किंवा आपापल्या प्रभाराधीन क्षेत्रात आयुक्तास किंवा १.(अधीक्षकास) ती व्यक्ती तशी आहे असे वाजवी रीतीने वाटत असेल आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ४१० मध्ये उल्लेखिलेल्या कोणत्याही अपराधाद्वारे किंवा कलमे ४१७,४१८,४१९ किंवा ४२० अन्वये शिक्षापात्र असा अपराध करुन कोणत्याही मालमत्तेचा ताबा हस्तांतरित करण्यात आला आहे असा संशय असल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्याकडून लेखी किंवा मुद्रित माहिती मिळाली असून, ती मालमत्ता तिच्या ताब्यात सापडेल किंवा त्यानंतर ती तिच्या ताब्यात येईल किंवा विक्रीने, तारणाने किंवा अदलाबदलीने किंवा अभिरक्षेसाठी,फेरफारसाठी किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कारणांसाठी त्याला देण्यात येईल तर त्यास,-
(एक) त्याने, यथास्थिती, ताबडतोब आयुक्ताला किंवा १.(अधीक्षकाला) किंवा पोलीस ठाण्यात अशी मालमत्ता ताब्यात असल्याबद्दल किंवा दिली असल्याबद्दल माहिती न दिल्यास आणि ज्या व्यक्तीकडून ती मालमत्ता ताब्यात मिळाली असेल किंवा देण्यात आली असेल तिच्या नावाची व पत्त्याची उपरिनिर्दिष्ट माहिती देण्याविषयी सर्व वाजवी उपाययोजना न केल्यास, किंवा
(दोन) ती मालमत्ता, नेहमीच्या पोषाखाच्या किंवा इतर वस्तूप्रमाणे असल्यामुळे, दिलेल्या लेखी किंवा मुद्रित माहितीवरुन ओळखता येण्याजोगी नसून, अशी माहिती मिळाल्यावर कोणत्याही प्रकारे लपविण्यात आली नसल्यास, अपराथासिद्धीनंतर त्याच्या ताब्यात असलेल्या किंवा त्याला देऊ केलेल्या मालमत्तेतील अशा प्रत्येक वस्तूच्या बाबतीत २.(दोन हजार रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतकया द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
——–
१. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये जिल्हा अधिक्षकास या शब्दाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम २३ अन्वये पन्नास रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply