महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १०८ :
सार्वजनिक विहिरींमधील, वगैरेंमधील पाणी दुषित करणे:
कोणतीही व्यक्ती कोणत्याही सार्वजनिक विहिरीतील, तलावातील, जलाशयातील, कुंडातील, तळ्यातील, नहरातील किंवा नदीच्या, ओढ्याच्या, नाल्याच्या किंवा पुरवठ्याच्या इतर उगमाच्या किंवा साधनाच्या कोणत्याही भागातील पाणी, ते ज्या कोणत्याही कारणांसाठी सक्षम प्राधिकाऱ्याच्या आदेशान्वये राखून ठेवलेले असेल त्या कारणांसाठी ते कमी उपयुक्त होईल अशा रीतीने दूषित करणार नाही किंवा करविणार नाही.