Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम ५८ : अटक व्यक्तीला २४ तासांपेक्षा जास्त काळ स्थानबध्द करून ठेवणे नाही :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५८ :
अटक व्यक्तीला २४ तासांपेक्षा जास्त काळ स्थानबध्द करून ठेवणे नाही :
कोणताही पोलीस अधिकारी, वॉरंटाशिवाय अटक केलेल्या व्यक्तीला, प्रकरणाच्या समग्र परिस्थितीनुसार वाजवी असेल त्याहून अधिक काळ हवालतील स्थानबध्द करणार नाही, व दंडाधिकाऱ्याने कलम १८७ खाली विशेष आदेश दिला नसताना असा कालावधी, अटकेच्या स्थळापासून दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयापर्यंतच्या प्रवासासाठी आवश्यक असलेला अवधी वगळता, चोवीस तासांहून अधिक असणार नाही मग ते अधिकार क्षेत्र असो वा नसो.

Exit mobile version