Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम ४६४ : कारावासाच्या शिक्षादेशाच्या अंमलबजावणीचे निलंबन :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४६४ :
कारावासाच्या शिक्षादेशाच्या अंमलबजावणीचे निलंबन :
१) जेव्हा एखाद्या अपराध्याला फक्त द्रव्यदंडाचीच शिक्षा देण्यात आली असेल व द्रव्यदंड भरण्यात कसून झाल्यास कारावासाची शिक्षा फर्मावण्यात आली असेल व द्रव्यदंड तत्काळ भरला गेला नसेल तेव्हा, न्यायालय-
(a) क) (अ) असा आदेश देऊ शकेल की, एकतर आदेशाच्या दिनांकपासून उशिरात उशिरा तीस दिवसांपर्यंत कोणत्याही दिनांकास किंवा तत्पूर्वी द्रव्यदंड एकदम सगळा भरला जावा अथवा दोन किंवा तीन हप्त्यांनी दिला जावा व त्यांपैकी पहिला हप्ता आदेशाच्या दिनांकापासून उशिरात उशिरा तीस दिवसांपर्यंत कोणत्याही दिनांकास किंवा तत्पूर्वी आणि अन्य हप्ता किंवा हप्ते जास्तीत जास्त दिवसांच्या कालांतराने किंवा, प्रकरणपरत्वे, कालांतरागणिक भरला जावा;
(b) ख) (ब) ज्या दिनांकास किंवा दिनांकांना किंवा ज्यापूर्वी द्रव्यदंडाचा किंवा प्रकरणपरत्वे, त्याच्या हप्त्यांचा भरणा करावयाचा त्या दिनांकास किंवा दिनांकांना अपराध्याने उपस्थित व्हावे अशी शर्त अंतभूत असलेले असे, न्यायालयाला योग्य वाटेल त्याप्रमाणे बंधपंत्र किंवा जामीनपत्र अपराध्याने निष्पादित करून दिल्यावर कारावासाच्या शिक्षेची अंमलबजावणी निलंबित करून अपराध्याची सुटका करू शकेल; आणि द्रव्यदंडाची किंवा प्रकरणपरत्वे, त्याच्या कोणत्याही हप्त्याची रक्कम आदेशानुसार उशिरात उशिरा ज्या अखेरच्या दिनांकास प्रदेय होती त्या दिनांकास किंवा तत्पूर्वी वसून झाली नाही तर, न्यायालय लगेच कारावासाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याचा निदेश देऊ शकेल.
२) पैशाचा भरणा केला जावा व तो वसून न झाल्यास कारावासाची शिक्षा द्यावी असा आदेश देण्यात आला असून पैशाचा तत्काळ भरणा झाला नसेल अशाही एखाद्या प्रकरणी, पोटकलम (१) चे उपबंध लागू असतील; आणि ज्या व्यक्तीविरूद्ध आदेश देण्यात आला तिने त्या पोटकलमात निर्दिष्ट करण्यात आलेले असे बंधपत्र करून देणे आवश्यक केले असता ती तसे करण्यास चुकली तर, न्यायालय लगेच कारावासांचा शिक्षादेश देऊ शकेल.

Exit mobile version