Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम ४६३ : जेथे हि संहिता लागू नाही अशा राज्य क्षेत्रातील न्यायालयाचे द्रव्यदंडाच्या वसुलीचे वॉरंट :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४६३ :
जेथे हि संहिता लागू नाही अशा राज्य क्षेत्रातील न्यायालयाचे द्रव्यदंडाच्या वसुलीचे वॉरंट :
या संहितेत किंवा त्या त्या काळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असेले तरी, जेथे या संहितेचा विस्तार नाही अशा कोणत्याही राज्यक्षेत्रातील फौजदारी न्यायालयाने अपराध्याला द्रव्यदंड भरण्याची शिक्षा दिलेली असेल व जेथे या संहितेचा विस्तार आहे त्या राज्यक्षेत्रांतील एखाद्या जिल्ह्याच्या जिल्ह्याधिकाऱ्याला जणू काही ती रक्कम जमीन-महसुलाची थकबाकी असावी त्याप्रमाणे ती वसूल करण्यास प्राधिकृत करणारे वॉरंट शिक्षा देणाऱ्या न्यायालयाने त्याला निदेशून काढणे असेल तेव्हा असे वॉरंट हे जेथे या संहितेचा विस्तार आहे, त्या राज्यक्षेत्रांतील न्यायालयाने कलम ४६१ च्या पोटकलम (१) च्या खंड (b)(ख) खाली काढलेले वॉरंट असल्याचे मानले जाईल, व अशा वॉरंटाच्या अंमलबजावणीबाबतचे उक्त कलमाच्या पोटकलम (३) मधील उपबंध तदनुसार लागू होतील.

Exit mobile version