Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम ४१३ : अन्यथा तरतुदींशिवाय अपील होऊ शकणार नाही :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण ३१ :
अपीलें :
कलम ४१३ :
अन्यथा तरतुदींशिवाय अपील होऊ शकणार नाही :
या संहितेने किंवा त्या त्या काळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याने उपबंधित केले असेल तेवढे खेरीजकरून एरव्ही,
फौजदारी न्यायालयाच्या कोणत्याही न्यायनिर्णयावर किंवा आदेशावर अपील होऊ शकणार नाही :
परंतु, बळी पडलेल्या व्यक्तीस, आरोपी व्यक्तीस दोषमुक्त करणाऱ्या किंवा सौम्य अपराधासाठी दोषसिध्द ठरविणाऱ्या किंवा अपर्याप्त नुकसानभरपाई लादणाऱ्या न्यायालयाने संमत केलेल्या कोणत्याही आदेशाविरूध्द अपील करण्याचा हक्क असेल, आणि असे अपील, अशा न्यायालयाच्या दोषसिध्दीच्या आदेशाविरूध्द सर्वसाधारणपणे ज्या न्यायालयात अपील करण्यात येते, त्या न्यायालयाकडे दाखल करण्यात येईल.

Exit mobile version