भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३७ :
नियुक्त पोलीस अधिकारी :
राज्य शासन,-
(a) क) (अ) प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि राज्य स्तरावर पोलीस नियंत्रण कथ स्थापन करील;
(b) ख) (ब) राज्य सरकार, प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी नसलेला पोलिस अधिकारी नियुक्त करेल, जो अटक केलल्या व्यक्तींची नाव आणि पत्ता , गुन्ह्याचे स्वरुप ज्यासाठी त्याला आरोपित केले आहे ती यासंबंधी माहिती जतन करण्यासाठी जबाबदार असेल, जी प्रत्येक पोलीस ठाणे आणि जिल्हा मुख्यालयात डिजिटल मोडसह कोणत्याही प्रकारे ठळकपणे प्रदर्शित केले जाईल.
