Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम ३७८ : मनोविकल व्यक्तीस नातलगाचे अगर मित्राच्या हवाली करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३७८ :
मनोविकल व्यक्तीस नातलगाचे अगर मित्राच्या हवाली करणे :
१) जेव्हा केव्हा कलम ३६९ च्या किंवा कलम ३७४ च्या उपबंधाखाली अडकवून ठेवलेल्या कोणत्याही व्यक्तीचा एकादा नातलग किंवा मित्र, तिला आपल्या हवाली करण्यात यावे अशी इच्छा प्रदर्शित करील तेव्हा, राज्य शासन अशा नातलगाने किंवा मित्राने तसा अर्ज केल्यावर आणि-
(a) क) (अ) हवाली केल्या जाणाऱ्या व्यक्तीची यथायोग्य काळजी घेतली जावी आणि स्वत:ला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला इजा पोचवण्यास तिला प्रतिबंध व्हावा यासाठी;
(b) ख) (ब) राज्य शासन निदेशित करील त्या अधिकाऱ्यासमोर आणि त्या त्या वेळी व स्थळी निरीक्षणासाठी तिला हजर केले जावे यासाठी;
(c) ग) (क) एखाद्या व्यक्तीला कलम ३६९ च्या पोटकलम (२)खाली अडकवून ठेवले असल्यास, आवश्यक तेव्हा अशा दंडाधिकाऱ्यासमोर किंवा न्यायालयासमोर तिला हजर केले जावे यासाठी,
अशा राज्य शासनाला समाधानकारक वाटेल असा जामीन त्याने दिल्यावर, अशा व्यक्तीला अशा नातलगाच्या किंवा मित्राच्या हवाली केले जावे असा आदेश देईल.
२) याप्रमाणे हवली केलेल्या व्यक्तीवर एखाद्या अपराधाचा आरोप असून ती मनोविकल असल्यामुळे व स्वत:चा बचाव करण्यास अक्षम असल्यामुळे त्या अपराधाची संपरीक्षा लांबणीवर टाकण्यात आली असेल आणि पोटकलम (१) च्या खंड (ख) मध्ये निर्दिष्ट केलेल्या निरीक्षक अधिकाऱ्याने, अशी व्यक्ती स्वत:चा बचाव करण्यास सक्षम आहे असे प्रमाणित करून केव्हाही दंडाधिकाऱ्याला किंवा न्यायालयाला कळवले तर, असा दंडाधिकारी किंवा न्यायालय अशा आरोपी व्यक्तीला ज्या नातलगाच्या किंवा मित्राच्या हवाली करण्यात आले असेल त्याने त्या व्यक्तीला दंडाधिकाऱ्यासमोर किंवा न्यायालयासमोर हजर करावे असे फर्मावील; आणि याप्रमाणे तिला हजर करण्यात आल्यावर, न्यायालय कलम ३७१ च्या उपबंधानुसार कार्यवाही करील; आणि निरीक्ष अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र पुराव्यात स्वीकारण्याजोगे असेल.

Exit mobile version