Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम ३२३ : आयोगपत्र प्रतिवेदनासह परत करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३२३ :
आयोगपत्र प्रतिवेदनासह परत करणे :
१) कलम ३१९ खाली काढलेल्या कोणत्याही आयोगपत्राची रीतसर अंमलबजावणी करण्यात आल्यावर आयोगपत्र काढणाऱ्या न्यायालयाकडे किंवा दंडाधिकाऱ्याकडे त्याखाली साक्षतपासणी केलेल्या साक्षीदाराच्या जबानीसह ते परत पाठवले जाईल आणि आयोगपत्र, त्याचे प्रतिवेदन व जबानी पक्षकारांना निरीक्षणासाठी सर्व वाजवी वेळी खुली राहील व सर्व रास्त अपवाद सोडून, कोणत्याही पक्षकाराला ते त्या खटल्यामध्ये पुराव्यादाखल वाचता येतील व ते अभिलेखाचा भाग होतील.
२) याप्रमाणे घेतलेली कोणतीही जबानी जर भारतीय साक्ष्य अधिनियम २०२३ कलम २७ द्वारे विहित केलेल्या शर्तीची पूर्तता करत असेल तर तो खटला दुसऱ्या न्यायालयाकडे असतानाही नंतरच्या कोणालाही टप्प्यातदेखील पुराव्यात स्वीकारली जाईल.

Exit mobile version