Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम २८५ : संक्षिप्त संपरीक्षेची प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २८५ :
संक्षिप्त संपरीक्षेची प्रक्रिया :
१) या प्रकरणाखालील संपरीक्षेमध्ये या संहितेत समन्स- खटल्याच्या संपरीक्षेसाठी विनिर्दिष्ट केलेली प्रक्रिया, यात यापुढे उल्लेखिलेली बाब खेरीजकरून एरव्ही अनुसरली जाईल.
२) त्या प्रकरणाखालील कोणत्याही दोषसिध्दीच्या बाबतीत, तीन महिन्यांहून अधिक मुदतीच्या शिक्षेचा आदेश काढला जाणार नाही.

Exit mobile version