Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम २८३ : संक्षिप्त संपरीक्षा करण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण २२ :
संक्षिप्त संपरीक्षा :
कलम २८३ :
संक्षिप्त संपरीक्षा करण्याचा अधिकार :
१) या संहितेत काहीही अंतर्भूत असेले तरी,-
(a) क) (अ) कोणत्याही मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याला;
(b) ख) (ब) कोणत्याही प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याला,
पुढील सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही अपराधांची संक्षिप्त संपरीक्षा करता येईल :-
एक) भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ३०३ च्या पोटकलम (२), कलम ३०५ किंवा कलम ३०६ खाली चोरीचा अपराध, चोरीच्या मालमत्तेचे मूल्य वीस हजार रूपयांहून अधिक नसेल त्या बाबतीत;
दोन) भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ३१७ च्या पोटकलम (२) खाली चोरीची मालमत्ता लपवून ठेवण्याचा किंवा ठेवून घेण्याचा अपराध अशा मालमत्तेचे मूल्य वीस हजार रूपयांहून अधिक नसेल त्या बाबतीत;
तीन) भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१७ च्या पोटकलम (५) खाली चोरीची मालमत्ता लपवून ठेवण्याच्या किंवा तिची विल्हेवाट करण्याच्या कामी साह्य करण्याचा अपराध अशा मालमत्तेचे मूल्य वीस हजार रूपयांहून अधिक नसेल त्या बाबतीत;
चार) भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ३३१ च्या पोटकलम (२) आणि पोटकलम (३) खालील अपराध ;
पाच) भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३५२ खाली शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करण्याचा अपराध व कलम ३५१ च्या पोटकलम (२) खाली फौजदारीपात्र धाकदपटशाचा अपराध;
सहा) पूर्वोक्त अपराधांपैकी कोणत्याही अपराधाचे अपप्रेरण;
सात) पूर्वोक्त अपराधांपैकी कोणताही अपराध करण्याचा प्रयत्न हाच अपराध असेल त्या बाबतीत, असा प्रयत्न;
आठ) ज्या कृतीबाबत गुरे अतिक्रमण अधिनियम, १८७१ (१८७१ चा १) कलम २० खाली फिर्याद देता येईल अशा कृतीने घडलेला अपराध.
२) दंडाधिकारी, आरोपीला सुनावणीची वाजवी संधी दिल्यानंतर, कारणे लेखी नमूद करुन, सर्व किंवा कोणत्याही गुन्ह्यांसाठी मृत्यू किंवा आजीवन कारावास किंवा तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी कारावासाची शिक्षा होऊ शकत नाही अशा अपराधांची संक्षिप्त संपरीक्षा करता येईल :
परन्तु या पोटकलमाखाली कोणताही खटलाच्या संक्षेपत: संपरीक्षा करण्याच्या कोणत्याही दंडाधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध कोणतेही अपील करता येणार नाही.
३) जेव्हा संक्षिप्त संपरीक्षेच्या ओघात दंडाधिकाऱ्याला, त्या खटल्याची संक्षेपत: संपरीक्षा करणे इष्ट नाही असे त्याचे स्वरूप आहे असे दिसून येईल तेव्हा, दंडाधिकारी पूर्वी साक्ष तपासणी केलेल्या अशा कोणत्याही साक्षीदारांना पुन्हा बोलावील आणि या संहितेत उपबंधित केलेल्या रीतीने त्या खटल्याची फेरसुनावणी करण्यात सुरूवात करील.

Exit mobile version