Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम २८१ : विवक्षित प्रसंगी कार्यवाही थांबवण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २८१ :
विवक्षित प्रसंगी कार्यवाही थांबवण्याचा अधिकार :
फिर्याद देण्यात आल्यावरून नव्हे, तर अन्य प्रकारे गुदरलेल्या कोणत्याही समन्स- खटल्यात प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याला किंवा मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याच्या पूर्वमंजुरीने अन्य कोणत्याही न्याय दंडाधिकाऱ्याला कार्यवाही कोणत्याही टप्प्यात असताना, कारणे नमूद करून कोणताही न्यायनिर्णय अधिघोषित न करता ती कार्यवाही थांबवता येईल व प्रमुख साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आल्यानंतर याप्रमाणे कार्यवाही थांबवण्यात आली असेल त्या बाबतीत, त्याला दोषमुक्तीचा न्यायनिर्णय अधिघोषित करता येईल व अन्य कोणत्याही बाबतीत आरोपीची मुक्तता करता येईल व अशी मुक्तता सुटेसारखीच परिणामक असेल.

Exit mobile version