Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम २५६ : बचावाला सुरूवात करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २५६ :
बचावाला सुरूवात करणे :
१) आरोपीस कलम २५५ खाली दोषमुक्त करण्यात आले नाही, तर त्या बाबतीत त्याला आपल्या बचावाला सुरूवात करण्यास आणि त्याच्या पुष्टयर्थ त्याच्याकडे असले तो कोणताही साक्षीपुरावा हजर करण्यास सांगितले जाईल.
२) जर आरोपीने कोणतेही कैफियतपत्र दिले तर, न्यायाधीश ते अभिलेखात दाखल करील.
३) एखाद्या साक्षीदाराने समक्ष हजर होण्यास अथवा कोणताही कागद किंवा वस्तू हजर केली जाण्यास भाग पाडण्याकरता कोणतीही आदेशिका काढण्याबाबत आरोपीने अर्ज केला तर, न्यायाधीश अशी आदेशिका काढील- मात्र, असा अर्ज त्रास देण्यासाठी किंवा विलंब लावण्यासाठी किंवा न्यायाची उद्दीष्टे विफल करण्यासाठी केलेला आहे या कारणास्तव तो नाकारावा असे त्याला वाटले तर त्यास त्याबद्दलची कारणे लेखी नमूद करावी लागतील.

Exit mobile version