Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम २४७ : अनेक दोषारोपांपैकी एकाबाबत दोषसिध्दी झाल्यावर उरलेले मागे घेणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २४७ :
अनेक दोषारोपांपैकी एकाबाबत दोषसिध्दी झाल्यावर उरलेले मागे घेणे :
जेव्हा एकाच व्यक्तीच्या विरूध्द एकापेक्षा अधिक शीर्षे अंतर्भूत असलेल्या दोषारोपांची मांडणी करण्यात येते आणि त्यांच्यापैकी एका किंवा अधिक दोषारोपांवरून दोषसिध्दी झालेली असेल तेव्हा, फिर्याददारास किंवा खटला चालवणाऱ्या अधिकाऱ्यास, न्यायालयाच्या संमतीने उरलेले दोषरोप मागे घेता येतील, अथवा न्यायालयास स्वत: होऊन अशा दोषारोपाची किंवा दोषारोपांची चौकशी किंवा संपरीक्षा स्थगित करता येईल आणि याप्रमाणे ते दोषारोप मागे घेणे हे असा दोषारोप किंवा असे दोषारोप यातून मुक्त करण्यासारखेच परिणामक असेल; मात्र दोषसिध्दी रद्द ठरल्यास त्या बाबतीत उक्त न्यायालयास (दोषसिध्दी रद्द ठरवणाऱ्या न्यायालयाच्या आदेशाच्या अधीनतेने ) याप्रमाणे मागे घेतलेल्या दोषारोपाची किंवा दोषारोपांची चौकशी किंवा संपरीक्षा पुढे चालवता येईल.

Exit mobile version