Site icon Ajinkya Innovations

Bnss कलम १३० : आदेश काढणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १३० :
आदेश काढणे :
जेव्हा कलम १२६, कलम १२७, कलम १२८ किंवा कलम १२९ खाली कार्य करणाऱ्या दंडाधिकाऱ्याला अशा कलमाखाली कोणत्याही व्यक्तीला कारण दाखवावयास लावणे जरूरीचे वाटेल तेव्हा, तो मिळालेल्या खबरीचा सारांश, निष्पादित करावयाच्या बंधपत्राची रक्कम, किती काळ ते अंमलात राहावयाचे ती मुदत, आणि कोणतेही जामीनदारांची संख्या, जामीन भरण्यासाठी पर्याप्तता आणि योग्यतेचा विचार केल्यानंतर ते नमुद करणारा लेखी आदेश काढील.

Exit mobile version