भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १२२ :
काही हस्तांतरण रद्दबातल :
कलम ११७ पोटकलम (१) प्रमाणे आदेश दिल्यावर अगर कलम ११९ प्रमाणे नोटीस दिल्यावर नंतर जर त्यात नमूद केलेली मिळकत जर कोणी कोणत्याही पध्दतीने हस्तांतरित केली तर असे हस्तांतरण या प्रकरणामधील कारवाईच्या प्रयोजनासाठी लक्षात घेतले जाणार नाही. आणि जर अशी मिळकत नंतर केंद्र सरकारला कलम १२० प्रमाणे जमा केली असेल तर असे हस्तांतरण रद्दबातल होईल.
