भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
(B) ख) (ब) – अटकेचे वॉरंट :
कलम ७२ :
अटक वॉरंट नमुना व मुदत :
१) या संहितेखाली न्यायालयाने काढलेले अटकेचे प्रत्येक वॉरंट लेखी व अशा न्यायालयाच्या पीठासीन अधिकाऱ्याने स्वाक्षरित केलेले असेल व त्यावर न्यायालयाची मोहोर लावलेली असेल.
२) असे प्रत्येक वॉरंट, ज्याने ते काढले ते न्यायालय ते रद्द करीपर्यंत किंवा त्याची अमंलबजावणी होईलपर्यंत, अमलात राहील.