Bnss कलम ७१ : साक्षीदाराला पोस्टाने समन्साची बजावणी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ७१ :
साक्षीदाराला पोस्टाने समन्साची बजावणी :
१) या प्रकरणाच्या पूर्वगामी कलमांत काहीही अंतर्भूत असले तरी, साक्षीदाराला समन्स काढणारे न्यायालय असे समन्स काढून त्याशिवाय आणखी त्याच वेळी समन्सची एक प्रत साक्षीदाराला उद्देशून, तो जेथे सर्वसामान्यपणे राहात असेल किंवा धंदा चालवत असेल किंवा कमाईसाठी जातीने काम करत असेल त्या स्थळी नोंदणी डाकेने बजावण्याचा निदेश देऊ शकेल.
२) जेव्हा साक्षीदाराने स्वाक्षरित केल्याचे दिसणारी पोच किंवा साक्षीदाराने समन्सची सुपूर्दगी घेण्याचे नाकारले अशा आशयाचे डाक कर्मचाऱ्याने स्वाक्षरित केल्याचे दिसणारे पृष्ठांकन मिळेल तेव्हा, किंवा न्यायालयाच्या समाधानासाठी इलैक्ट्रॉनिक संप्रेषणाद्वारे कलम ७० च्या पोटकलम (३) अंतर्गत समन्स वितरित केल्याच्या पुराव्यावर, समन्स काढणाऱ्या न्यायालयाला समन्स रीतसर बजावण्यात आले आहे असे घोषित करता येईल.

Leave a Reply