Bnss कलम ६७ : आधी दिलेल्या पध्दतीने बजावणी होत नसेल तर :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ६७ :
आधी दिलेल्या पध्दतीने बजावणी होत नसेल तर :
जर यथायोग्य तत्परता दाखवूनही कलम ६४, कलम ६५ किंवा कलम ६६ मध्ये उपबंधित केल्याप्रमाणे बजावणी करता येत नसेल तर, बजावणी करणारा अधिकारी हा समन्स काढलेली व्यक्ती ज्या घरात किंवा ज्या घरवाडीत सर्वसामान्यापणे राहात असेल तेथील एखाद्या ठळक भागी समन्सचा दोन प्रतिलिप्यांपैकी एक लावील; आणि तदनंतर न्यायालय आपणांस योग्य वाटतील अशा चौकशी केल्यानंतर समन्स रीतसर बजावण्यात आले आहे असे घोषित करू शकेल किंवा आपणांस उचित वाटेल अशा रीतीने त्याची नव्याने बजावणी करण्याचा आदेश देऊ शकेल.

Leave a Reply